Tap to Read ➤
केसांतील कोंडा दूर करण्याचे ८ उपाय...
घरगुती नैसर्गिक उपाय केव्हाही जास्त चांगले
थंडीच्या दिवसांत केसांत कोंडा होणे सामान्य असले तरी काही सोप्या उपायांनी ते टाळता येऊ शकते.
कोमट खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करुन त्याने केसांना हलका मसाज करावा आणि मग केस धुवून टाकावेत.
अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणात घेऊन हे मिश्रण शाम्पू केल्यानंतर कंडीशनरप्रमाणे केसांना लावावे.
ताजा कोरफडीचा गर केसांच्या मूळांशी लावल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.
कडुलिंबाच्या तेलात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने कोंडा जाण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरते.
केसांच्या समस्या कमी होण्यासाठी दही फायदेशीर असून कोंड्यावरही ३० मिनीटे दही लावणे आणि मग केस धुणे हा चांगला उपाय आहे.
टी ट्री ऑईल, लव्हेंडर ऑईल यांसारखी इसेन्शियल ऑईल नेहमीच्या तेलात मिसळायचे आणि त्याने केसांना चांगला मसाज करायचा.
मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट केसांना लावल्यास कोंड्याची समस्या कमी होते.
बेकींग सोडा आणि पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट लावल्यास कोंडा कायमचा कमी होतो.
क्लिक करा