Tap to Read ➤

चहाचे कळकट्ट करपलेले भांडे होईल चकाचक, ८ सोपे उपाय...

चहाच्या भांड्यांवरील काळपट, जळके डाग घालवण्यासाठी घरगुती सोपे उपाय ठरतील उपयोगी...
चहाच्या करपलेल्या भांड्यात व्हिनेगर ओतून ते गरम करावे, त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून हे भांड स्क्रबरने घासून स्वच्छ करावं.
चहाने जळलेल्या भांड्यात पाणी घेऊन त्यात जाडे मीठ घालून काही काळ तसेच ठेवून मग लिक्विड डिशवॉशने स्वच्छ करावे.
चहा वारंवार गरम करून जळके भांडे स्वच्छ करण्यासाठी त्यात लिंबाचा रस घालावा, स्क्रबरने घासून स्वच्छ करावे.
भांड्यांवरील चहाचे जळके डाग काढण्यासाठी भांड्यात टोमॅटोचा रस व पाणी ओतून ते गरम करावे, यामुळे डाग निघून जाण्यास मदत होते.
चहाचे जळके भांडे स्वच्छ करण्यासाठी त्यात डिटर्जंट पावडर व पाणी घालून गरम करावेत, यामुळे जळके डाग सहज निघून जातील.
गरम पाण्यात बेकिंग सोडा, लिंबूचा रस मिसळून हे मिश्रण चहाच्या जळक्या भांड्यात ओतून गरम करावे, यामुळे जळके डाग निघून जातात.
तुरटीची पावडर व लिक्विड डिशवॉश एकत्रित करून डागांवर लावा, यामुळे जळके भांडे स्वच्छ दिसेल.
टोमॅटो सॉस ओतून त्याचा जाडसर थर जळलेल्या भांड्यावर लावा आणि रात्रभर तसाच राहू द्या, यामुळे करपलेले डाग लगेच निघून जातील.
क्लिक करा