Tap to Read ➤

तुम्ही बर्न आऊट झाल्याची पाहा ८ लक्षणे

अनेकदा आपण थकतो तरी न थांबता स्वत:ला खेचत राहतो
आपण रोजची कामे करता करता मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे थकून जातो. हा थकवा येण्यामागची कारणं समजून घ्यायला हवीत.
अनेकदा आपण विकेंडलाही आराम न करता काही ना काही कामं, प्लॅन्स करतो आणि मग शारीरिक, मानसिक आराम न मिळाल्याने पुरते थकून जातो.
खूप गर्दीत असलो तरी आपल्याला एकटे किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर आपण मानसकिरित्या बर्न आऊट आहोत हे लक्षात घ्यायला हवे.
कामातला आपला परफॉर्मन्स खाली जात असेल तरी आपण बर्न आऊट झालो आहोत हे समजून घ्यायला हवे.
तुम्हाला रात्रीची सलग झोप येत नसेल आणि वाचारांनी सतत मध्ये मध्ये जाग येत असेल तर तुम्ही खूप थकत आहात हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.
सतत डोकेदुखी, अंगदुखी, पोटाच्या किंवा अपचनाच्या समस्या असतील तर शरीरावर कामाचा ताण येत असल्याचे हे लक्षण आहे.
आहार, व्यायाम, झोप यांसारख्या स्वत:ची काळजी घेण्याच्या गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष होत असेल तर याचा अर्थ तुम्ही थकत आहात.
सततचा विसराळूपणा, लक्ष केंद्रित करण्यात अडथळे यांसारख्या गोष्टीही तुमचा मेंदू थकत असल्याचे दाखवतो.
सतत दारु पिणे, जंक फूडचे सेवन किंवा इतर चुकीच्या सवयी तुम्हाला मानसिक थकवा किंवा शीण आल्याचे दर्शवतात.
क्लिक करा