आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'सामनावीर' ठरलेले 8 खेळाडू...
यादीत 3 भारतीय फलंदाजांचा समावेश...!
सचिन तेंडुलकर -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकरने सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. त्याने ७६ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
विराट कोहली -
या बाबतीत भारताचा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६९ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
सनथ जयसूर्या -
श्रीलंकेचा सनथ जयसूर्या या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५८ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
जॅक कॅलिस -
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलीसने ५७ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
कुमार संगाकारा -
श्रीलंकेच्या कुमार संगाकाराने ५० वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आह.
रिकी पॉन्टिंग -
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने आपल्या कारकिर्दित एकूण ४९ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत.
शाकिब अल हसन -
बांगलादेशच्या शाकिब अल हसनने एकूण ४५ वेळा सामनावीर म्हणून पुरस्कार जिंकला आहे.
रोहित शर्मा -
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.