ब्रेसियर ॲक्सेसरीजचे हे ८ प्रकार तुम्हांला माहिती आहेत का ?
ब्रेसियर खरेदी केल्यानंतर काहीवेळा ब्रेसियरच्या पट्ट्यांबाबत अनेक समस्या उद्भवतात. यासाठी तुम्हाला ब्रा ॲक्सेसरीज बद्दल माहित असायलाच पाहिजे.
जर बॅकलेस ड्रेस घालायचा असेल आणि ड्रेस पॅडेड नसेल तर लो बॅक कनव्हर्टरचा वापर करावा. ब्रेसियरला लो बॅक कनव्हर्टर लावून ती लो बॅक ब्रेसियरमध्ये कन्व्हर्ट करता येते.
डबल साइडेड टेपचा वापर करून ब्रेसियरची पट्टी ड्रेसच्या स्लिव्हजला चिटकवू शकता.
रेसर ब्रा कन्व्हर्टर वापरल्याने नेहमीच्या ब्राला हटके व स्टायलिश बॅक देऊ शकता. जर ब्रा स्ट्रीप खांद्यावरून सारखी खाली घसरत असेल तर ते ही बंद होईल.
जर कधी चुकीच्या साइजची ब्रेसियर विकत घेतली किंवा ब्रेसियरची साइज लहान झाली तर ब्रा स्ट्रिप एक्सटेंडर वापरून ब्रेसियरची साइज वाढवता येते.
ऑफ शोल्डर, बोटनेक, डिपनेक ड्रेसमध्ये ब्रा ची पट्टी दिसू नये म्हणून आपण ट्रान्सपरंट ब्रा पट्टीचा वापर करु शकता.
सिलिकॉन ब्रा ही स्तनांना चिकटून राहून योग्य कव्हरेज देते याचे कप सिलिकॉनचे असून या ब्रा ला स्ट्रिप्स नसतात, वेस्टर्न ड्रेसमध्ये आपण ही ब्रा वापरु शकता.
जेव्हा कोणताही ऑफ शोल्डर, बोटनेक ड्रेस घालताना त्याच्या खांद्यावर स्ट्रीप होल्डर लावा, यामुळे ब्रा चे पट्टे खाली घसरणार नाहीत.
डिटॅचेबल स्ट्रेप्स ब्रामध्ये आपण ब्रा चे पट्टे ड्रेसमधून समोरून दिसत असतील तर ते थेट काढून ब्रा च्या मागच्या बाजूला अटॅच करु शकतो. जेणेकरून ब्रा चे पट्टे दिसणार नाहीत.