Tap to Read ➤
८ सवयी - कोलेस्टेरॉल राहील नियंत्रणात
उत्तम आरोग्यासाठी जीवनशैली चांगली हवी..
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवून हृदयाचे कार्य सुरळीत ठेवायचे तर जीवनशैलीत काही बदल अवश्य करायला हवेत.
संतुलित आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ताण कमी करणाऱ्या योगा, ध्यान, प्राणायाम यांसारख्या गोष्टी केल्यास कोलेस्टेरॉल ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अल्कोहोल अती प्रमाणात घेतल्यास कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यावर नियंत्रण हवे.
आहारात चांगल्या फॅट्सचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात राहते
तळलेले पदार्थ शक्यतो टाळायला हवेत, कारण त्यामुळे ट्रान्स फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते
भरपूर पाणी पिणे हेही कोलेस्टेरॉल पातळी आणि हृदयाचे कार्य नियंत्रणात राहण्यासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट असते.
कोलेस्टेरॉल प्रमाणाबाहेर वाढून त्रास होऊ नये यासाठी नियमित व्यायाम करायला हवा.
कोलेस्टेरॉलची पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश करायला हवा.
क्लिक करा