Tap to Read ➤

हार्ट ॲटॅकपासून दूर ठेवतील हे ८ पदार्थ

हृदयाचं कार्य सुरळीत ठेवायचं तर आहाराकडे लक्ष द्यायलाच हवं...
पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला फायबर आणि मायक्रोन्यूट्रीयंटस मिळण्यास मदत होते, हे घटक हृदयासाठी उपयुक्त असतात.
ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. मात्र त्याचा योग्य प्रमाणातच वापर करावा.
बिन्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आणि जळजळ कमी होण्यासाठी बिन्स चांगल्या असतात.
डाळींबातील अँटीऑक्सिडंटस जळजळ कमी करण्यास फायदेशीर ठरतात, तसेच धमन्या चांगल्या राहाव्यात यासाठी डाळींब खाणे फायद्याचे ठरते.
रीफाईंड कार्बोहाड्रेटसपेक्षा आहारात होल ग्रेनचा वापर करणे केव्हाही अधिक चांगले
बटाट्यामध्ये फायबर तर जास्त असतेच पण पोटॅशियमही जास्त प्रमाणात असल्याने रक्तदाब कमी होण्यास बटाटे उपयुक्त ठरतात.
ओमेगा ६, ओमेगा ३ आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅटस असलेला हा सुकामेवा हृदयासाठी अतिशय फायदेशीर असतो.
पपईमध्ये असलेला लायकोपेन हा घटक हार्ट ॲटॅकची शक्यता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो.