मुलांना हसरं, आनंदी आणि कॉन्फिडन्ट बनविणाऱ्या ७ गोष्टी
किरकिरी, रडकी मुलं कोणालाच आवडत नाहीत. त्याउलट हसरी, आनंदी मुलं सगळ्यांना आपलंसं करतात.
मुलांचं व्यक्तिमत्त्व हसरं- आनंदी होण्यासाठी तसेच त्यांना सकारात्मक, कॉन्फिडन्ट करण्यासाठी काही गोष्टी पालकांनी आवर्जून कराव्यात...
मुलांना त्यांच्या भावना मोकळ्या करायला, त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगायला नेहमी प्रोत्साहन द्या. त्यांना कायम गप्प बसवू नका.
मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी घरातल्या गोष्टींबाबत चर्चा करा. यामुळे आपणही घरात महत्त्वाचे आहोत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते.
तुमची मुलं अभ्यासात किती हुशार आहेत, यावरून तुमचं त्यांच्याशी वागणं ठरवू नका. वाईट गोष्टी त्यांना सौम्य शब्दांत समजावून सांगा, तसेच चांगल्या गोष्टींचे कौतूक करायला विसरू नका.
समवयस्क मुलांशी मैत्री करण्यासाठी मुलांना कायम प्रोत्साहन द्या.
दिवसातून अर्धा तास का असेना पण मुलांनी मैदानावर जावं, सायकलिंग करावं, व्यायाम करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.
अभ्यासाचं आणि इतर सगळ्याच कामांचं एक रुटीन मुलांना ठरवून द्या आणि त्यांना ते पाळायला सांगा.