Tap to Read ➤
७ टिप्स- वय वाढलं तरी त्वचा राहील तरुण, म्हातारपण येणारच नाही
वाढत्या वयासोबत त्वचेचं सौंदर्य कमी होऊ द्यायचं नसेल तर हे काही साधे- सोपे उपाय रोज नेमाने करायलाच हवेत..
पहिला उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. कोरडी पडत नाही.
एखादे सॉफ्ट क्लिंजर वापरून चेहरा दिवसातून दोन वेळा धुवा.. यामुळे त्वचा नेहमीच फ्रेश राहील.
त्वचेसाठी नेहमीच उत्तम दर्जाचे मॉईश्चरायझर घ्या. त्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळून ती तजेलदार राहाते.
त्वचेवरची डेडस्किन, टॅनिंग काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करणं आवश्यक आहे.
त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच त्वचा सैलसर पडू नये यासाठी नियमितपणे एखादा फेसपॅक वापरावा.
सनस्क्रिन लोशन तुमच्या डेली स्किन केअर रुटीनचा एक भाग असायलाच हवा.
रात्रीची जागरणं टाळून नेहमीच पुरेशी झोप घ्या. यामुळे त्वचा चांगली राहाते.
क्लिक करा