Tap to Read ➤

टोमॅटो सॉस वापरून करा किचन सफाई ! ७ भन्नाट टिप्स...

पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण टोमॅटो सॉसचा वापर तर करतोच परंतु खाण्यासोबतच घरातील इतर गोष्टींच्या स्वच्छतेसाठी देखील याचा वापर करता येऊ शकतो....
न्युडल्स, पास्ता, बर्गर यांसारख्या जंक फूडची चव वाढवण्यासाठी आपण टोमॅटो सॉस सोबत हे पदार्थ खाऊ शकतो, खाण्यासोबतच घरातील स्वछतेसाठी देखील याचा वापर करता येतो.
घरांतील तांब्या - पितळेच्या भांड्यांवरील काळा थर हटवण्यासाठी टोमॅटो सॉस लावून भांडी घासून घ्यावी, यामुळे भांडी पूर्वीसारखी चमकून लख्ख होतात.
चांदीच्या वस्तू किंवा दागिने वर्षानुवर्षे तसेच ठेवून काळे पडले असतील तर त्यांना टोमॅटो सॉस लावून ब्रशने घासून घ्यावे, यामुळे चांदीच्या वस्तू स्वच्छ होण्यास मदत मिळते.
घरातील खिडक्यांच्या काचा तसेच कारच्या काचा चमकवण्यासाठी, त्यावर टोमॅटो सॉस लावून त्या स्वच्छ करून घ्याव्यात. यामुळे काचांवरील जुने डाग निघून जाऊन त्या पुन्हा चमकू लागतात.
खाऱ्या व जड पाण्यामुळे लोखंडी नळ गंजून खराब होतात यावरील गंज काढण्यासाठी त्याला सॉस लावून स्क्रबरने घासून गंज काढून घ्यावा.
वर्षांनुवर्षे वापरल्यामुळे स्टीलच्या भांड्यांची चमक निघून जाते, ही चमक परत आणण्यासाठी सॉस लावून ही भांडी स्वच्छ घासून घ्यावीत.
बेसिन किंवा सिंकच्या पाइपमधून येणारी घाणेरडी दुर्गंधी कमी करण्यासाठी टोमॅटो सॉस आणि पाण्याचे मिश्रण बनवून त्यात ओतावे, यामुळे पाइपमध्ये अडकलेली घाण निघून जाऊन दुर्गंधी कमी होते.
क्लिक करा