Tap to Read ➤

दिवाळीत शेपमध्ये दिसायचं तर करा फक्त ७ गोष्टी

दिवाळीसाठी वजन कमी करण्यासाठी सोप्या डाएट टिप्स
वर्षातील मोठा सण असलेल्या दिवाळीत आपण भरपूर खरेदी करतो आणि या सुट्टीत स्वत:कडेही थोडं लक्ष द्यायचं ठरवतो.
दिवाळीपर्यंत तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर डाएटमध्ये काही बदल आवर्जून करायला हवे.
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून ते प्यायल्यास अनावश्यक चरबी घटण्यास मदत होते.
दिवसभरातील प्रत्येक जेवणात डाळी, टोफू, पनीर, अंडी यांसारख्या प्रोटीन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
आहारात रिफाईंड शुगर आणि कार्बोहायड्रेटस यांचे प्रमाण आटोक्यात राहील याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
बदाम, अॅव्हाकॅडो, ऑलिव्ह ऑईल यांमध्ये हेल्दी फॅटस असतात त्यामुळे वजन कमी होण्यासाठी हे या पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
दिवाळीच्या दिवसांत रात्री उशीरा जेवणे टाळा आणि वेळेच्या आधी जेवा, तसेच हेल्दी पर्याय खाण्याचा प्रयत्न असूद्या
श्वसनाचे व्यायाम, ध्यान, आवडीच्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्या ज्यामुळे ताण कमी होईल आणि वजन आटोक्यात राहण्यास मदत होईल.
तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर डाएट आणि व्यायाम यांबाबत प्लॅनिंग करताना डॉक्टर, डाएटीशियन यांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.
क्लिक करा