Tap to Read ➤

अंजीर दुधात घालून पिण्याचे ७ भन्नाट फायदे

आरोग्यासाठी वरदान ठरतात आहारातील लहान बदल...
दूध आणि सुकामेवा हे दोन्हीही घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहे.
पण दे दोन्ही एकत्र करुन घेतल्यास शरीराला जास्त कॅल्शियम मिळत असल्याने हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते.
अंजीर गोड तर दुधात प्रोटीन्स असल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यासाठी हे मिश्रण उत्तम आहे.
अंजीरामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने पोट नीट साफ होण्यास मदत होते.
अंजीरातील अँटीऑक्सिडंटस आणि व्हिटॅमिन्स त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास फायदेशीर ठरतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी हे मिश्रण अतिशय उपयुक्त ठरते.
अंजीर-दूध एकत्र घेतल्याने शरीराला फायबर, प्रोटीन यांमुळे पोषण मिळते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
अंजीर दूध घेतल्याने शरीराला लोह, बी १२ मिळते, ज्यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
क्लिक करा