Tap to Read ➤

उलटे चालण्याचे ७ भन्नाट फायदे

सरळ तर नेहमीच चालतो, उलटं चालून पाहा की
चालणं हा एकप्रकारचा व्यायाम आहे हे खरं आहे, पण म्हणून सरळ चालण्यापेक्षा उलटं चालण्याचे जास्त फायदे आहेत..
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उलटं चालणं अतिशय फायदेशीर असतं
सरळ चालताना जे स्नायू वापरले जातात त्यापेक्षा वेगळे स्नायू उलटं चालताना वापरले जातात.
गुडघ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी उलटं चालण्याचा चांगला फायदा होतो.
सरळ चालण्यापेक्षा उलटं चालताना जास्त एकाग्रता लागते. यामध्ये बॅलन्स आणि कोऑर्डीनेशन स्कील्सही लागतात.
उलटं चालताना लहान आणि भराभर पावलं टाकावी लागतात, यामुळे पायाच्या खालच्या भागातील ताकद वाढते.
हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी उलटं चालण्याचा फायदा होतो.
उलटं चालल्याने आपलं बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते, मणक्याचा नैसर्गिक आकार चांगला राहतो.
त्यामुळे तुम्हीही नियमितपणे उलटे चालण्याचा सराव करा, नक्कीच फायदा होईल.
क्लिक करा