नेलपॉलिशचे हे ७ उपयोग तुम्हाला माहितीच नसतील, घ्या यादी...
फक्त नखं सुंदर दिसण्यासाठीच नेलपेंटचा वापर करू नका, नेलपेंटचे इतरही आहेत ७ भन्नाट फायदे...
खोट्या आर्टिफिशियल ज्वेलरीने स्किन रॅश होत असतील तर अशा ज्वेलरीवर ट्रान्सपरंट नेलपेंट लावावी, यामुळे आर्टिफिशियल ज्वेलरी वापरल्याने स्किन रॅश येणार नाहीत.
आपले इयररिंग्स जर कपड्यांना मॅच होणारे नसतील तर वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेंटने आपण आपले आर्टिफिशियल इयररिंग्स रंगवू शकता.
कपडे लटकवण्यासाठी वापरात येणाऱ्या हँगर्सना नवीन लूक देण्यासाठी आपण या नेलपेंटचा वापर करु शकता. हँगर्सवर नेलपेंटने वेगवेगळे डिजाईन करु शकता.
सुईत धागा ओवताना जर तो जात नसेल तर धाग्याच्या टोकाला थोडेसे नेलपेंट लावून सुकवून घ्यावे, यामुळे धागा पटकन सुईत ओवला जातो.
जर आपल्याकडे अनेक प्रकारच्या चाव्या असतील तर त्या त्यांवर ओळखण्यासाठी वेगवेगळ्या खुणा करण्यासाठी अनेक प्रकारच्या नेलपेंटच्या रंगाचा वापर केला जाऊ शकतो.
श्यूजच्या लेसचे प्लॅस्टिक निघाल्यामुळे लेस खराब होण्याची शक्यता असते अशावेळी लेसच्या टोकांना ट्रान्सपरंट नेलपेंट लावून घ्यावी.
घरातील लाकडी सामान बराचकाळ वापरल्याने त्यावरचा गुळगुळीतपणा नाहीसा होतो. अशावेळी त्या जागी ट्रान्सपरंट नेलपेंटने पेंट करुन घ्यावे.