हिरॉईन व्हायचं म्हणून घर सोडून मुंबई गाठणाऱ्या ७ अभिनेत्री - SAKHI
बी - टाऊनमधील कलाकारांच्या पूर्व आयुष्यात काय घडले हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या ७ अभिनेत्रींनी कलाक्षेत्रात येण्यापूर्वी घरातून पळ काढला होता.
चमचमणाऱ्या दुनियेत येण्यापूर्वी काही अभिनेत्रींनी खूप स्ट्रगल केलं आहे. त्यांनी आपले घर - दार सोडून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
मर्डर या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मल्लिका शेरावतने सिनेसृष्टीत येण्यासाठी घरासह आपल्या नवऱ्याला सोडले होते.
सिनेसृष्टीत येण्यापूर्वी चित्रांगदा सिंहने आपल्या पतीसह घर आणि कुटुंबाला सोडले.
फिल्मी दुनियेत पुन्हा येण्यासाठी अभिनेत्री डिंपल कपाडीयाने दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांचे घर सोडले होते.
सिनेसृष्टीत येण्यासाठी आदिती राव हैदरी हिने पतीकडून घटस्पोट घेतला होता. घर सोडून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवले.
दमदार अभिनेत्री राधिका आपटेच्या वडिलांना तिचे अभिनेत्री बनणे खटकत होते, यासाठी तिने आपले घर सोडले होते.
पंजाबची कतरिना अर्थात शहनाज गिलने एका मुलाखतीत सांगितले होते की, अभिनेत्री बनण्यासाठी ती घरापासून वेगळी झाली.
अभिनेत्री हीना खानचे घरचे अभिनय या करियरच्या विरोधात होते. मात्र, त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला साथ दिली.