Tap to Read ➤
सालं न काढता खायला हव्यात ६ भाज्या
पुरेपूर पोषण मिळण्यासाठी सालांसकट भाज्या खाणे फायद्याचेच
आपण सर्रास सगळ्याच भाज्यांची सालं काढतो पण त्यामुळे त्याचे पोषण कमी होण्याची शक्यता असते.
बटाट्याची सालं नाही काढली तरी चालतात, कारण त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर हे घटक असतात.
थंडीत भरपूर मिळणारे गाजर अँटीऑक्सिडंटस आणि फायबरचा उत्तम स्त्रोत असते, ते साल न काढता खायला हवे.
काकडीही सालांसहीत खाल्ल्याने त्यातील फायबर आणि सिलिका हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पेशी लवकर खराब होऊ नयेत यासाठी वांगं सालासहीत खाणं उपयुक्त ठरतं.
रताळ्याच्या सालांतून शरीराला फायबर्स, खनिजे आणि व्हिटॅमिन्स चांगल्या प्रमाणात मिळतात.
टोमॅटो सालांसकट खाणे अँटीऑक्सिडंटस आणि फायबर्स मिळण्यासाठी फायदेशीर असतो.
क्लिक करा