Tap to Read ➤

स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ- चकाचक ठेवण्यासाठी ६ सोप्या टिप्स

स्वयंपाकघर ही अशी एक जागा असते, जिथून सगळ्या घराचं आरोग्य जपलं जातं. त्यामुळे ते नेहमीच स्वच्छ, चकाचक असणं गरजेचं आहे.
स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं हे अवघड काम वाटत असेल तर या ५ सवयी स्वत:ला लावून घ्या. यामुळे तुमचं स्वयंपाक घर नेहमीच अगदी टापटीप राहण्यास मदत होईल.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना नेहमीच ओट्यावर आधी पेपर टाका. त्यानंतरच चिरणे, कणिक मळणे, कापणे अशी कामं करा. त्यामुळे ओटा खराब होणार नाही.
गॅसवर, ओट्यावर, भांड्यांवर डाग पडले तर ते ओले असतानाच लगेच पुसून घेण्याची सवय लावा. डाग वाळल्यानंतर काढणं खूप अवघड आणि वेळखाऊ असतं.
जसं डागांचं आहे, तसंच सिंकमधल्या भांड्यांचं. भांड्यांचं काम झालं की ती लगेच धुवून टाका.
जर भांडी लगेच धुणं शक्य नसेल तर ती ओट्यावर तशीच पसरू न देता एका टबमध्ये जमा करा.
आठवड्यातून कधीही एक दिवस १० मिनिटांचा वेळ स्वयंपाक घरातील कोपरे स्वच्छ करण्यासाठी द्या.
रात्री झोपण्यापुर्वी ओटा स्वच्छ आवरून मगच झोपा. यामुळे स्वयंपाक घरात झुरळं, किडे होणार नाहीत.
क्लिक करा