Tap to Read ➤
मधल्या वेळच्या भुकेसाठी खायला हवेत भाजलेले चणे, ६ फायदे
जाता-येता खाण्यासाठी उत्तम पर्याय...
चणे किंवा फुटाणे हा टाइमपास स्नॅक्स वाटत असला तरी आरोग्यासाठी तो अतिशय चांगला असतो.
चणे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असून स्नायूंच्या बळकटीसाठी आणि एकूण आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
चण्यांमध्ये फायबर चांगले असल्याने दिर्घकाळ पोट भरलेले राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
हा लो फॅट स्नॅक असल्याने वजन नियंत्रण करणाऱ्यांसाठी हा उत्तम स्नॅक प्रकार आहे.
फुटाण्यामध्ये असणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी फायदेशीर ठरतात.
चण्यामध्ये फोलेट, लोह, फॉस्फरस, मँगनीज असे बरेच व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात.
यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
क्लिक करा