वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ पाण्यात भिजवून खाणं फायदेशीर ठरतं. कारण त्यामुळे पचनक्रिया आणि मेटाबाॅलिझम चांगलं होतं.
यापैकी पहिला पदार्थ आहे भिजवलेले बदाम. त्यातून हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स, तसेच व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात मिळते.
दुसरा पदार्थ आहे चिया सीड्स. त्यातून फायबर आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात मिळते.
रात्रभर पाण्यात भिजवलेले ओट्स दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होण्यास मदत होते.
भिजवलेले अक्रोड खाल्ल्यानेही ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात मिळते.
कोणतीही डाळ शिजविण्यापुर्वी ती काही तास पाण्यामध्ये भिजत घालावी. त्यामुळे ती पचनासाठी अधिक चांगली होते. शिवाय त्यातून खनिजे आणि फायबरही भरपूर प्रमाणात मिळतात.
भोपळ्याच्या बिया भिजवून खाल्ल्याने त्यातून मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते आणि पचन चांगले होण्यासोबतच स्नायूंचा थकवाही कमी होतो.