Tap to Read ➤
वजन भराभर कमी करण्यासाठी ६ सोप्या टिप्स
वाढत्या वजनामुळे हैराण झाला असाल तर हे काही साधे- सोपे बदल तुमच्या रुटीनमध्ये करून पाहा.. वजन लवकर कमी होईल.
तुमच्या नाश्त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स घ्या. यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही.
दही, ताक असे प्रोबायोटिक जेवणात असू द्या. यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया चांगली होते.
जंकफूड, पॅकफूड, प्रोसेस्ड फूड खाणं पुर्णपणे टाळा.
जेवताना मोबाईल, टीव्ही बघत जेवू नका. प्रत्येक घास बारीक चावून खा. तसेच सावकाश जेवा. यामुळे ओव्हरइटिंग होत नाही.
कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. ताण घेतल्यास शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि वजन वाढायला लागते.
रात्रीची शोप शांत आणि पुरेशी होणं गरजेचं आहे. नाहीतर हार्मोन्सचे संतुलन बिघडून वजन वाढायला लागते.
क्लिक करा