Tap to Read ➤
खोबऱ्याचे ६ भन्नाट पदार्थ, नुसते पाहिले तरी तोंडाला पाणी सुटेल...
संपूर्ण भारतात नारळाचा वापर विविध कारणांसाठी होतो. मुख्य म्हणजे पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा वापर जास्त होतो.
२ सप्टेंबर रोजी सर्वत्र जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिन मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो.
यातील बहुगुणांमुळे नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हटले जाते. नारळाचा वापर फक्त जेवणासाठी नसून, स्किन, केस आणि इतर कारणांसाठीही होतो.
परंतु, नारळाचा वापर करून किती पदार्थ तयार केले जातात, याची माहिती आपल्याला आहे का?
महाराष्ट्रात खोबऱ्याची बर्फी फार फेमस आहे. यात साखर आणि मावाचा वापर केला जातो.
साऊथ इंडियन पदार्थ असोत किंवा पराठा, तोंडी लावण्यासाठी ताटात खोबऱ्याची चटणी हवीच.
नारळ भात कोणाला नाही आवडत. चवीला हा पदार्थ भन्नाट तर लागतोच, शिवाय करायलाही सोपा आहे.
खोबऱ्याचे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे लाडू करायलाही सोपे असतात.
केकची चव वाढवण्यासाठी आपण व्हॅनिला केकवर खोबऱ्याचा किस पसरवू शकता, यामुळे केक दिसायलाही सुंदर दिसेल.
तांदुळाच्या खीरमध्ये आपण खोबऱ्याचा किस मिक्स करू शकता. यामुळे खिरीची चव आणखी वाढेल.
आपण खोबरेल तेलाचा वापर आहारात देखील करू शकता. यामुळे वजन कमी होते, यासह पचनसंस्था सुधारते.
क्लिक करा