Tap to Read ➤
रिलॅक्स होऊन शांत झोप लागण्यासाठी ५ सोपी आसनं...
थकलेल्या शरीराला आराम हवा तर...
दिवसभराच्या कामाने आणि विविध ताणांनी आलेला थकवा दूर होण्यासाठी योगासनं अतिशय फायदेशीर ठरतात.
अगदी झटपट होणारी ही सोपी आसनं ५ ते ७ मिनीटांत होणारी असून त्यामुळे रिलॅक्स वाटण्यास मदत होते.
गुडघ्यावर बसायचे असे सोपे असलेले वज्रासन पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
पश्चिमोत्तानासनामुळे मणका, मांडीचे स्नायू आणि मज्जासंस्था यांचे चांगल्या पद्धतीने स्ट्रेचिंग होण्यास मदत होते.
शवासन हे सर्वात सोपे आसन असून मानसिक आणि शारीरिकरित्या रिलॅक्स होण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते.
बालासन शरीराला रिलॅक्स करणारे आसन आहे. छाती, पाठ, मणका याचा व्यायाम झाल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.
उत्तानासनामध्ये खाली वाकल्याने मान, पाठ, मणका, मांड्या, कंबर अशा सगळ्याच स्नायूंना ताण पडतो आणि आखडलेले शरीर मोकळे होण्यास मदत होते.
क्लिक करा