मुलांना स्मार्ट आणि कॉन्फिडन्ट बनविणाऱ्या ५ गोष्टी
तुमचीही मुलं होतील एकदम स्मार्ट, ॲक्टिव्ह आणि कॉन्फिडन्ट.. त्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. फक्त याकाही गोष्टींकडे मात्र आवर्जून लक्ष द्या..
मुलं स्मार्ट व्हावी असं वाटत असेल तर त्यांना कायम नवनविन गोष्टींची माहिती द्या, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा
त्यासोबतच मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही द्या. त्यांच्याकडची माहिती, प्रश्न विचारण्याची त्यांची क्षमता जशी वाढत जाईल, तसा त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
आजुबाजुच्या वातावरणाचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही पॉझिटीव्ह राहा. घरातलं वातावरण आनंदी ठेवा.
मुलांच्या चुकांवर चर्चा करण्यापेक्षा त्या चूका कशा सुधारता येतील यावर जास्त विचार करा.
मुलांना नेहमी त्यांच्या कम्फर्ट झोनबाहेर आणण्याचा, नविन काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करा. तरच त्यांची प्रगती होते.