Tap to Read ➤

काखेतला काळसरपणा घालविण्यासाठी ५ टिप्स

काही जणींच्या काखेमध्ये खूप काळसरपणा असतो. त्यामुळे मग स्लिव्हलेस ड्रेस घालायलाही नकोसे वाटते.
सध्या तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे स्लिव्हलेस कपडे घालणार असाल तर सगळ्यात आधी काखेतला काळेपणा घालविण्यासाठी हे काही उपाय करून बघा.
खूप घट्ट कपडे घालणं टाळा. घट्ट कपडे घातल्याने काखेत काचते आणि तिथला काळेपणा वाढतो.
बेसनपीठ, दही आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र करून लावा आणि ५ ते ७ मिनिटांनी चाेळून काढून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
बटाट्याचा रस, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून काखेमध्ये लावल्यानेही काळेपणा कमी होण्यास मदत होते.
काखेमध्ये नेहमी मारता तो बॉडी स्प्रे चांगल्या दर्जाचा असावा. अन्यथा त्यामुळेही काळेपणा वाढू शकतो.
दिवसातून दोन वेळा आंघोळ करून काखेमध्ये साबण लावून स्वच्छ धुवा.
क्लिक करा