Tap to Read ➤

तुमचं B-12 कमी आहे हे कसं ओळखणार? बघा ५ लक्षणं

भारतात बहुसंख्य लोकांना व्हिटॅमिन B-12 ची कमतरता दिसून येते. त्यात महिलांचं प्रमाण तर खूप जास्त आहे. B-12 ची कमतरता असल्याचं आपलं शरीर सांगत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
म्हणूनच व्हिटॅमिन B-12 ची कमतरता सांगणारी ही काही लक्षणं जाणून घ्या आणि तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
व्हिटॅमिन बी- १२ ची कमतरता असण्याचे सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे खूप थकवा येणं. श्वासांची गती वाढलेली असणं.
हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील, तर ते देखील B-12 ची कमतरता असण्याचं लक्षण आहे.
B-12 ची कमतरता असल्यास एकाग्रता कमी होणं, चिडचिडेपणा वाढणं, विसराळूपणा वाढणं असाही त्रास होतो.
सतत तोंड येत असेल तर एकदा B-12 तपासून घ्या.
त्वचा निस्तेज झाली असेल, काविळ झाल्याप्रमाणे पिवळट पडली असेल तरीही ते व्हिटॅमिन बी- १२ ची कमतरता असल्याचं एक लक्षण असू शकतं.
क्लिक करा