मुलांचे शारिरीक, मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच त्यांचे अभ्यासात लक्ष लागते आणि ते प्रगती करतात.
म्हणूनच मुलांनी एकाग्रतेने अभ्यास करून प्रगती करावी यासाठी त्यांना काही पदार्थ आवर्जून खाऊ घालणं गरजेचं आहे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..
मुलांना नाचणीने वेगवेगळे पदार्थ खाऊ घाला. कारण त्यातून प्रोटीन्स, मायक्रोन्युट्रीयंट्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात.
मुलांच्या आहारातील मेथीचे प्रमाण वाढवा. कारण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ती उपयुक्त ठरते.
मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी रताळेही खूप उपयुक्त मानले जाते. त्यातून फायबर, मायक्रोन्युट्रियंट्स आणि प्रोटीन्स मिळतात.
मेंदूचे कार्य अधिक चांगले होण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बाजरी खाणे उत्तम मानले जाते.
बेरी प्रकारातल्या फळांमधून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि मेंदूचे कार्य अधिक चांगले होण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.