शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी काही शाकाहारी पदार्थ तुमची नक्कीच मदत करू शकतात.
सगळ्यात पहिला पदार्थ आहे मुगाची डाळ. मुगाच्या डाळीचं वरण, सूप, मुगाच्या डाळीचे डोसे, इडली अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून तुम्ही मुगाची डाळ रोज खा.
दुसरा पदार्थ आहे सोयाबीन. त्यामधूनही भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.
दूध, दही आणि ताक हे पदार्थही भरपूर प्रोटीन्स देणारे आहेत.
पनीर हा सुद्धा प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. पनीरचे पराठे, फ्राईड पनीर किंवा भाजी अशा वेगवेगळ्या माध्यमातून पनीर खायला हवे.
बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया अशा सुकामेव्यामधूनही प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात.