Tap to Read ➤
केस लांबसडक वाढण्यासाठी आहारात घ्या ५ पदार्थ
आहारातून मिळेल केसांना उत्तम पोषण...
केस लांबसडक वाढावेत यासाठी बाहेरुन काळजी घेतोच पण त्यांना आहारातूनही चांगले पोषण मिळायला हवे.
पालकामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन्स चांगले असल्याने केसांच्या वाढीसाठी तो उपयुक्त असतो.
रताळ्यामध्ये असलेले बिटा केरोटीन व्हिटॅमिन एची निर्मिती करते. केसांची मुळे पक्की होण्यासाठी ते आवश्यक असते.
सुकामेवा आणि बियांमध्ये झिंक, ओमेगा ३ फॅटी अॅसिड चांगले असते. त्यामुळे जवस, चिया सिडस, बदाम, आक्रोड खायला हवे.
अॅव्हाकॅडो हे फळ भारतात कमी प्रमाणात मिळत असले तरी ते केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
शिमला मिरचीमध्ये असणारे व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मितीसाठी उपयुक्त असते. केस वाढण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
याशिवाय भरपूर पाणी पिणे आणि एकूणच आहार आणि आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते.
क्लिक करा