लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांना द्या हे ५ सुपरफूड
जरा वातावरण बदललं की त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो.
सगळ्या पालकांमध्ये एकच तक्रार असते ती म्हणजे लहान मूल वारंवार आजारी पडण्याची.
जरा वातावरण बदललं की त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच, असे काही सुपरफूड पाहुयात. ज्यामुळे मुलांची इम्युनिटी बूस्ट होईल.
लहान मुलांना दूध देतांना ते कायम कोमट असावं. सोबतच, त्याच्यात चिमूटभर हळद आणि चवीपूरतं मध घालावं.
आठवड्यातून एकदा तुम्ही मुलांना तुळस आणि आल्याचा काढाही देऊ शकता. यासाठी तुळशीच्या पानांच्या रसात आल्याचा रस, मध मिक्स करुन सकाळच्या वेळात मुलांना द्या.
खारीक आणि बदाम रात्रभर भिजवून त्याची सकाळी पेस्ट करा आणि ही पेस्ट दुधात मिक्स करुन मुलांना द्या.
मनुकादेखील तुम्ही मुलांना देऊ शकता. (वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)