ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर या अब्जाधीशांचे बुडाले २०९ अब्ज डॉलर
ट्रम्प यांच्याशी मैत्री पडली महागात
डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा उपस्थित असलेले पाच अब्जाधीश मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार यापैकी पाच अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत २०९ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
जेफ बेजोस : जेफ बेजोस यांच्या अॅमेझॉनचे शेअर्स १७ जानेवारीपासून १४ टक्क्यांनी घसरल्यामुळे २९ अब्ज डॉलर्स नुकसान झालं.
सेर्गे ब्रिन: ब्रिन यांच्या अल्फाबेट इंकच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झालीय. यामुळे २२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झालंय. ब्रिन यांची संपत्ती १४० अब्ज डॉलरवर आली आहे.
मार्क झुकरबर्ग: मेटाचा मॅग्निफिसेंट इन्टेक इंडेक्स २० टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे झुकरबर्गचे ५ अब्ज डॉलरचे नुकसान झालंय.
बर्नार्ड अर्नॉल्ट: लुई व्हिटॉन आणि बल्गारी सारख्या ब्रँडचे मालक अर्नॉल्ट यांना निवडणुकीनंतर २० टक्के फायदा झाला होता. मात्र आता तो गमावून त्यांचेही ५ अब्ज डॉलरचे नुकसान झालं.
एलॉन मस्क: डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात महत्त्वाची व्यक्ती मस्क यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मस्क यांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं असून त्यांची संपत्ती ३०७ अब्ज डॉलरवर आहे.