पावसाळ्यात पर्यटनासाठी बेस्ट ५ ठिकाणे

पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते.

मातीचा सुगंध, हिरवीगार झालेली झाडं आणि वातावरणातील गारवा खूप आल्हाददायक असतो. 

पहिल्या पावसात फिरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

लोणावळा आणि खंडाळा : पुणे आणि मुंबईच्या जवळ असलेले हे ठिकाण पहिल्या पावसात अधिक सुंदर आणि हिरवेगार होते.

महाबळेश्वर पावसाळ्यात धुक्याच्या चादरीखाली हरवून जाते. येथील पॉईंट्सवरून दिसणारे दऱ्यांचे आणि डोंगररांगांचे दृश्य खूप विलोभनीय असते.

माथेरान: पावसाळ्यात येथील निसर्गरम्यता अधिक वाढते. इथले शांत वातावरण आणि लाल मातीचे रस्ते फिरण्यासाठी खूप आनंददायी असतात.

भंडारदरा : हे ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. 

पावसाळ्यात येथील रंधा धबधबा आणि आर्थर लेक पर्यटकांना विशेष आकर्षित करतात.

अंबोली : हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. 

Click Here