३१ मार्चपर्यंत तुम्ही काय काय करू शकता? ७ गोष्टी, चटकन करा...
अशी ७ कामे ज्यांची अंतिम मुदत या महिन्याच्या अखेरीस, म्हणजे ३१ मार्च रोजी संपत आहे...
३१ मार्च जवळ आला आहे, त्यात हिंदू नववर्षाला सुरुवात होणार आहे. यामुळे बँकांसंबंधी कामे करण्यासाठी सुट्ट्यांचा अडथळा असणार आहे. अशातच काही कामे अशी आहे जी तुम्ही ३१ मार्च पूर्वी उरकली नाहीतर तर तुम्हाला मनस्ताप होणार आहे.
३१ मार्च रोजी २०२४-२५ आर्थिक वर्ष संपत असल्याने, काही मुदती देखील संपत आहेत. या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.
'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' (MSSC) १ एप्रिल २०२५ पासून बंद होत आहे. किमान १००० रुपये ते जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक २ वर्षांसाठी करता येते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते असेल, व या वर्षात पैसे जमा केले नसतील तर ते चालू ठेवण्यासाठी मिनिमम अमाऊंट भरता येणार आहे. नाहीतर ही खाती निष्क्रिय (बंद) होऊ शकतात.
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा कार्स यांनी एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कमी किंमतीत कार घ्यायची असेल तर ३१ मार्चपर्यंत वेळ आहे.
बँकेशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर बराच काळ निष्क्रिय असेल, तर तो ३१ मार्चपर्यंत सक्रिय करा. त्यानंतर असे नंबर UPI सिस्टममधून काढून टाकले जाणार आहेत.
विशेष ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी असेल. एसबीआयच्या 'अमृत कलश' आणि 'अमृत वृत्ती' ठेव योजनांसह ५ विशेष ठेव योजना ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहेत.
जर तुम्ही अजून कर बचतीची गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही ती ३१ मार्चपर्यंत करू शकता. पीपीएफ, टाइम डिपॉझिट आणि सुकन्या योजना यासह ६ योजना आहेत.
ज्यांचे मागील दोन वर्षांचे आयकर विवरणपत्र अपडेट करायचे आहे ते ३१ मार्चपूर्वी अपडेटेड विवरणपत्र दाखल करू शकतात.