गंभीरच्या रिप्लेसमेंटच्या रुपात तगडे अन् सर्वोत्तम ठरतील असे ३ पर्याय
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर कोचिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची कामगिरी घसरल्याचे दिसत आहे. गंभीरच्या टीम इंडियातील एन्ट्रीनंतर वनडे मालिकेत संघाला श्रीलंकेनं पराभवाचा दणका दिला होता.
घरच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने त्यात आणखी भर घातली. भारतीय संघावर व्हाइट वॉशची नामुष्की देखील ओढावली.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील टीम इंडियाच्या पराभवानंतर गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. लिटल मास्टर गावसकरांनीही टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ काय करतोय? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.
इथं एक नजर टाकुयात गंभीरच्या जागी टीम इंडियाच्या मुख्य कोचच्या रुपात सर्वोत्तम ठरतील अशा ३ चेहऱ्यांवर
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रुपात नव्या चेहऱ्याचा विचार करायचा झाला तर वुर्केरी व्यंकट रमन यांचे नाव शर्यतीत आघाडीवर येते.
गंभीर कोचच्या स्पर्धेत उतरला त्यावेळी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीनं महिला क्रिकेट संघाचे मुख्य कोच राहिलेल्या व्हीडब्लू रमण यांचे नावही शॉर्टलिस्ट केले होते.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या घडीला बॅकअप कोचच्या भूमिकेत दिसलेला चेहरा म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण देखील भारतीय संघाच्या कोचच्या रुपात एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
रवी शास्त्रींना पुन्हा एकदा संधी दिली तर त्याच नवल वाटणार नाही. त्यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने परदेशी मैदानात दमदार कामगिरी करून दाखवली आहे.