असे ३ फिरकीपटू ज्यांनी सर्वाधिक वेळा घेतलीये किंग कोहलीची विकेट
पुन्हा पुन्हा फिरकीच्या जाळ्यात फसतोय विराट
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात फसला. न्यूझीलंड विरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यात सँटनरच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला.
गेल्या काही दिवसांपासून कोहली लेफ्ट आर्म स्पिनरचा सामना करताना धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय.
२०२१ पासून आतापर्यंतच्या कसोटी सामन्यातील २१ डावात विराट कोहलीनं लेफ्ट आर्म स्पिनरसमोर फक्त २५९ धावा केल्या आहेत. याशिवाय ९ वेळा त्याने आपली विकेटफेकली आहे.
इथं एक नजर टाकुयात विराट कोहलीला दमवणाऱ्या ३ स्टार फिरकीपटूंबद्दल
इंग्लंडच्या ग्रॅमी स्वान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
विराट कोहलीला सर्वाधिक वेळा आउट करणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत इंग्लंडच्या आदिल रशीदचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९ वेळा त्याने विराट कोहलीची विकेट घेतलीये.
इंग्लंडच्या मोईन अलीनं सर्वाधिक १० वेळा विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पाहायला मिळाले आहे.