बजेट फ्रेंडली इंटरनॅशनल टूर, 80 हजारात फिरु शकता हे देश
तुम्ही इंटरनॅशनल टूर करायचा विचार करत असाल तर या बजेट फ्रेंडली देशांना नक्की व्हिजीट करा.
अनेक जण नवीन वर्षाची सुरुवात एखादी ट्रिप प्लॅन करुन करत असतात. त्यामुळे यंदा तुम्ही इंटरनॅशनल टूर करायचा विचार करत असाल तर या बजेट फ्रेंडली देशांना नक्की व्हिजीट करा.
आज आपण असे काही देश पाहुयात जे बजेट फ्रेंडली आहे. विशेष म्हणजे हे देश तुम्ही केवळ 80 हजारात फिरु शकता.
बजेट फ्रेंडली ट्रिपमध्ये नेपाळ हा बेस्ट पर्याय आहे. दिल्ली ते काठमांडू फ्लाइटचं तिकीट ६ ते ७ हजार इतकं आहे. तसंच राहण्याचा खर्चदेखील जास्त नाही. त्यामुळे मानसी ४०-५० हजारात तुम्ही ही ट्रिप करु शकता.
भूतानला जाण्यासाठी फ्लाइटचं तिकीट आणि राहण्याचा खर्च मिळून साधारणपणे ४०-४२ हजार रुपये लागतात. तर, भूतान फिरण्यासाठी ३० हजार पुरेसे होतात. त्यामुळे एकूण ही ट्रिप ७० हजारात होते.
श्रीलंकेला जात असाल तर २६ हजार इतका तुमचा २ वेळचा प्रवासखर्च होतो. तसंच तिथे राहणे, फिरणे आणि फूड यासाठी ३० हजारापर्यंत खर्च येतो. त्यामुळे अवघ्या ६० हजारात तुम्ही श्रीलंकेला जाऊ शकता.