भारतातील अनेक शहरे कडक उन्हाचा सामना करत आहेत. घरातील पंखे, एसी, कुलरच्या मदतीने लोक ही दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतात.
देशातील बहुतेक घरांमध्ये पंख्याचा सर्वाधिक वापर केला जातो तोही रात्रंदिवस.पंख्याला तुलनेने कमी वीज लागते.
ज्यांच्या घरात एसी किंवा कुलर आहे ते पंखे देखील वापरतात. त्यामुळे पंखा किती वेळ न बंद करता सुरु ठेवू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो.
बराच वेळ चालू असल्यामुळे पंखा बंद पडण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची भीती लोकांना असते. पंखा बराच वेळ वापरल्यामुळे गरम होतो.
तज्ञांच्या मते, जर तुम्ही सीलिंग फॅन सतत चालवत असाल तर तुम्ही दर ६ ते ८ तासांनी किमान एक तास तरी तो बंद करावा. असे न केल्यास पंखा खराब होऊ शकतो.
त्यामुळे जेव्हा तुम्ही सीलिंग फॅन खरेदी करता तेव्हा तो मोठ्या ब्रँडचा घेण्याचा प्रयत्न करा. तसेच बजेट मॉडेलचे पंखे देखील बराच काळ टिकतात.
पंख्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्याचे पाते वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. यासोबतच कोणताही विचित्र आवाज आल्यास इलेक्ट्रिशियनला बोलावून त्याची दुरुस्ती करावी.
पंख्याचा अतिवापर होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. रात्रंदिवस ते चालवल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गरज नसताना विजेची बचत करण्यासाठी पंखे बंद ठेवा.
ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. त्यासाठी आम्ही सामान्य माहितीची मदत घेतली आहे. लोकमत याला दुजोरा देत नाही.