Tap to Read ➤

दाट, मजबूत केसांसाठी करा फक्त १० गोष्टी

केस चांगले ठेवायचे तर नीट लक्ष द्यायला हवं
केस चांगले राहण्यासाठी दररोज आहारात किमान ४५ ग्रॅम प्रोटीन घ्यायला हवे.
शरीरात झिंकची कमतरता असेल तर केसगळती वाढते, आहारात आक्रोड, बदाम, ब्राझिल नट्स यांचा समावेश करा.
आहारात ओमेगा ३ फॅटी असिड वाढवल्यास केसांचा मजबूतपणा वाढण्यास मदत होते.
केस कोरडे असतील तर आठवड्यातून एकदा धुतले तरी चालते मात्र ते ऑईली असतील तर एक दिवसाआड किंवा रोज धुवायला हवेत.
ज्या शाम्पूमध्ये सोडियम आणि अमोनियम लॉरियल सल्फेट आहे असे शाम्पू अजिबात वापरू नयेत.
केस ओले असताना ते जोरजोरात पुसू नयेत. त्यामुळे केसांचा पोत खराब होण्याची, ते तुटण्याची शक्यता असते
केस चांगले राहण्यासाठी किमान ३ महिन्यांनी केस नियमित कापायला हवेत.
केस धुतल्यानंतर कंडीशनर लावायला विसरु नका
केसांना फाटे फुटू नयेत म्हणून हिटींग टुल्सचा जास्त वापर करु नका.
हेअर कलरची निवड करताना ३ शेड्सपेक्षा जास्त रंग केसांवर अप्लाय करु नका.