सणासुदीसाठी हातांवर मेहेंदी काढताय, गडद रंग येण्यासाठी १० सोपे पर्याय.
सणावारानिमित्त काहीजणी अगदी हौसेने हातांवर मेहेंदी काढतात पण त्याचा रंग खुलून येत नाही, यासाठी काही घरगुती झटपट उपाय...
मेहेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे आणि नीलगिरी किंवा मेहेंदीच्या पानांचे तेल हातांवर लावावे.
मेहेंदी काढल्यानंतर किमान ५ तास तरी हातांवर लावून ठेवावी.
हातांवरील मेहेंदी हलकी वाळल्यावर ती सुकून पडू लागते म्हणून त्यावर लिंबू आणि साखरेचा घोळ लावावा. ज्याने मेहेंदी बराचकाळ हातांवर चिकटून राहील.
मेहेंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, नाहीतर मेहेंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते.
मेहेंदीचा रंग फिकट वाटत असल्या त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स किंवा मोहरीचे तेल लावावे. हे सर्व पदार्थ उष्णता प्रदान करतात यामुळे मेहेंदीचा रंग गडद होत जातो.
मेहेंदी लावलेल्या हातांवर लवंगांचा धूर घेऊ शकता त्याचप्रमाणे यावर लोणच्याचे तेलही लावू शकतात, यामुळे मेहेंदीचा रंग अधिक गडद होतो.
पाणी न मिसळता मेहेंदी लावलेल्या हातांवर चुना रगडण्याने मेहेंदीचा रंग अधिक गडद होतो.
रात्री मेहेंदी लावली असल्यास सर्वात उत्तम. त्यानंतर रजई पांघरून झोपून जावे. याने हातांना उष्णता मिळेल आणि रंग चढेल.
मेहेंदीला नैसर्गिक रूपाने वाळू द्यावे, मेंदी वाळवण्याची घाई केल्यास त्यावर रंग चढणार नाही.
कोणत्याही कार्यक्रमासाठी मेहेंदी लावायची असेल तर कार्यक्रमाच्या १ किंवा २ दिवस आधी मेहेंदी लावावी. जेणेकरुन मेहेंदीला गडद रंग चढतो.