Tap to Read ➤

गोडगुलाबी थंडीत खायलाच हवेत असे १० पदार्थ...

थंडीत शरीराची उष्णता टिकून ठेवण्यासाठी आणि वेगवेगळ्या संसर्गांपासून दूर राहण्यासाठी थंडीत खायलाच हवेत असे १० पदार्थ...
मध शरीराला भरपूर लवकर उर्जा देण्यास मदत करते. मध आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यापासून बचाव करण्यासोबतच ती मजबूत बनवू शकते.
हिवाळ्यात साजूक तूप खाल्ल्याने शरीरात उर्जा निर्माण करण्यास मदत मिळते, शरीराची झीज भरून काढण्यासाठी तूप फायदेशीर ठरते. याचबरोबर आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते.
थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्तप्रवाहाची गती मंदावते. ज्यामुळे रक्तदाबासारखे आजार होतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशांनी गूळ खावा.
हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी घातल्यास शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
एक कप दुधात ४ ते ५ केशराच्या काड्या उकळून प्यायल्याने अनेक आजारांपासून सुटका होते, त्याचबरोबर केशर खाल्ल्याने शरीरात पुरेशी उष्णता निर्माण होण्यास मदत मिळते.
मोहरी हा मसाल्यातील एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात आपल्या शरीराला उष्णता मिळवून देण्याचे काम करतो, जे आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीने वाढवतं.
तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात.
हिवाळ्यात आलं खाल्ल्याने सर्दी, खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात, खवखवणा-या घशासाठी आलं रामबाण उपाय आहे.
हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीरातील उष्णता योग्य प्रमाणात राहते, त्यामुळे थंडीचा त्रास कमी जाणवतो.
हळद, मिरे, लवंग हे पदार्थ जंतूनाशक आहेत. शरीराचा दाह नाहीसे करणारे घटक असल्याने आहारात या पदार्थांचा थंडीच्या दिवसांत आवर्जून समावेश करायला हवा.
क्लिक करा