भूक लागूनही वेळेवर जेवत नाहीत? मग होऊ शकतो त्रास
अनेक जण भूक लागल्यानंतरही कामाच्या गडबडीत जेवण करायचं टाळतात. परंतु, ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.
वेळेवर न जेवणाचे काही दुष्परिणाम आहेत हे परिणाम कोणते ते पाहुयात.
भूक लागल्यावर न जेवल्यास भुकेमुळे अनेकदा अशक्तपणा येतो. पर्यायी, अनेकदा चक्कर येते.
उपाशीपोटी अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.
भूक लागल्यावर वेळेवर न जेवल्यास आणि नंतर वेळी-अवेळी खाल्लास वजन वाढते. वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात.
भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो.