पिनट बटर करायची सोपी रेसिपी. दहा मिनिटा करा घरीच. चव आणि पोषण दोन्ही भरपूर.
पिनट बटर हा एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे. त्यात भरपूर पोषण असते. मात्र विकत आणायला गेलात तर फार महाग मिळते.
घरी पिनट बटर करणे अगदी सोपे आहे. त्यासाठी फार वेळही लागत नाही आणि चवीला अगदी विकत सारखेच होते.
शेंगदाणे मस्त भाजायचे. भाजून झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची. भाजताना ते करपणार नाहीत याची काळजी घ्या.
मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घ्यायचे आणि वाटून त्याची पूड तयार करायची. सगळे दाणे छान वाटायचे. सरसरीत पूड तयार करायची.
पूड केल्यावर त्यात काही चमचे मध घालायचे. पूड आणि मध छान एकजीव करायचे.
मिश्रणात अगदी चिमटीभर मीठ घालायचे आणि मिक्सरमधून फिरवायचे. मस्त पेस्ट तयार होते.
हवाबंद डब्यात काढून घ्यायचे. फ्रिजमध्ये साठवून ठेवायचे. चवीला फार छान लागते.