ज्वारीचे करा हे ५ पदार्थ. आरोग्यासाठी फार चांगले आणि चवही भारी.
ज्वारीचे पीठ आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. आहारात या पिठाचा समावेश असायला हवा. शरीराला पोषण मिळते.
असे काही पदार्थ आहेत जे चवीला छान असतात आणि घरी करायला अगदीच सोपे. ज्वारीच्या पिठाचे पाच पदार्थ नक्कीच करा.
ज्वारीची भाकरी फार पौष्टिक असते. आठवड्यातून तीनदा करायला हरकत नाही. रोज खाल्ली तरी फायदाच आहे.
ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ करता येते. भाजणीसारखेच करायचे. कांदा, मिरची, मसाले सारे घालून मस्त थालीपीठ होते.
ज्वारीच्या पिठाचे अप्पे करता येतात. अप्पे आणि सोबत छान चटणी नक्की करुन पाहा. पीठ जरा घट्ट भिजवायचे.
ज्वारीच्या पिठाचे डोसे करायला अगदी सोपे असतात. पीठ तासभर भिजवले तरी छान डोसे होतात.
ज्वारीच्या पिठाचा मस्त ढोकळाही करता येतो. पौष्टिक आणि चविष्ट. करायला अगदीच सोपा असतो.