तुळशीची पानं खाण्याचे हे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
तुळशीची पानं योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी करण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकतात..
तुळस ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तुळशीची पानं खाल्ल्यामुळे चयापचय क्रिया चांगली होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांमुळे शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होते आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होतो.
तुळशीचा काढा हा नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.
तुळशीमध्ये ॲण्टीइन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरावरची सूज कमी होऊन वजन कमी होते.