शेळीचं दूध आहे आरोग्यासाठी वरदान
प्रत्येकाच्या घरात दररोज गाय किंवा म्हशीचं दूध येत असतं. या दुधाचे अनेक फायदेदेखील आहेत.
गाय किंवा म्हशीच्या दुधाइतकंच पौष्टिक दूध हे शेळीचं असतं. शेळीच्या दुधात अनेक गुणधर्म असून त्यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात.
डेंग्यू झाल्यास रुग्णाला शेळीचं दूध द्यावं. यामुळे प्लेटलेट्सचा काऊंट वाढतो. ज्यामुळए डेंग्यूवर मात करण्यास मदत मिळते.
शेळीच्या दुधामुळे शरीरातील फॉलिक अॅसिडचं प्रमाण वाढण्यास मदत मिळते.
या दुधामध्ये सेलेनियम असतं ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शेळीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, फास्फोरस, पोटॅशियम, आयर्न, कॉपर आढळते. ज्यामुळे मेटॅबॉलिझम रेट चांगला राहतो आणि शरीर निरोगी राहते.
शेळीच्या दुधात कॅल्शियम आणि अमीनो अॅसिड असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.