दिवाळीत केले जाणारे फराळाचे मस्त पदार्थ. यंदा नक्की करा. खास चव आणि सगळ्यांच्या आवडीचे.
दिवाळीसाठी खास फराळ घरोघरी केला जातो. पारंपरिक आपले ठरलेले पदार्थ यंदाही कराच. पाहा काही विसरत नाही ना?
शंकरपाळे तर हवेतच. गोड खमंग शंकरपाळे करा. त्यासोबत थोडे तिखटही करा. चहासोबत मस्त लागतात.
चकली हा फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. भाजणीची तयार आजकाल विकतही मिळते. घरी फक्त चकल्या पाडून तळायच्या.
चकलीचाच भाऊ म्हणजे कडबोळं. दिसायला आकाराला जरा साम्य असले तरी चवीला दोन्ही पदार्थ अगदी वेगळे असतात.
पोह्याचा चिवडा तर हवाच. दिवाळीत नाश्त्याला हा चिवडा खातात. त्यावर ताजा नारळ घालून त्याची चव वाढवता येते.
विविध प्रकारचे लाडू करता येतात. खास म्हणजे बेसनाचा लाडू आणि रव्याचा लाडू दिवाळीसाठी खास केला जातो.
अनारसे करायला तसे जरा कठीण आहेत. मात्र हा पदार्थ फार चविष्ट आणि खुसखुशीत असा असतो. नक्की करा.
फराळातला महत्वाचा पदार्थ म्हणजे करंजी. ओल्या नारळाची तसेच सुक्या खोबऱ्याची असे दोन प्रकार असतात. दोन्ही मस्तच लागतात.