पावसाळ्यात बहरतात ही फुले. नक्की लावा. छान सुगंधी, सुंदर.
फुले तर बाराही महिने फुलतात. मात्र पावसाळ्यात या फुलांचे रुप काही औरच दिसते.
पावसाळ्यात तगर मस्त फुलते. त्याचा सुगंध फार छान असतो. पांढऱ्या रंगाचे हे फुल नक्की लावा.
केसात माळण्यासाठी मोगरा तर हवाच. सुंदर सुवासिक मोगरा आता छान बहरायला लागला.
अगदी छोटी छोटी चमेलीची टवटवीत फुले पावसाळ्यात जागोजागी दिसतात. त्यांचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो.
सजावटीसाठी वापरली जाणारी शेवंत पावसाळ्यात छान फुलते. पांढरी, पिवळी, केशरी अशी विविध रंगी फुले असतात.
गुलाबी पांढरी अशी कण्हेरीची फुले पावसाळ्या दरम्यान फुलायला लागतात. अगदी सुंदर फुल असते.
निळ्या रंगाची गोकर्णाची फुले पावसाळ्यात छान बहरतात. हे फुल फार औषधी असते.