आलियासोबत प्राजक्ताची तुलना; 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:45 PM2022-05-19T12:45:37+5:302022-05-19T14:02:58+5:30

RaanBaazaar: या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींचे प्रचंड बोल्ड सीन पाहायला मिळत आहेत.

marathi actress prajaka mali mother reaction on ranbazar web series bold scene | आलियासोबत प्राजक्ताची तुलना; 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया

आलियासोबत प्राजक्ताची तुलना; 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

मराठी कलाविश्वात आजवर अनेक धाटणीच्या चित्रपट, वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली. परंतु, सध्या सोशल मीडियावर रानबाजार या आगामी वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. मराठीमध्ये पहिल्यांदाच इतक्या बोल्ड कंटेन्टच्या सीरिजची निर्मिती होत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित  (Tejasswini Pandit )आणि प्राजक्ता माळी (RaanBaazaar) मुख्य भूमिका साकारत असून या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित  झाला आहे. विशेष म्हणजे या सीरिजने प्रदर्शनापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त तिचीच चर्चा सुरु आहे. यामध्येच बोल्ड सीन देण्याविषयी प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच 'रानबाजार' या अपकमिंग वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सत्य घटनांच्या संदर्भावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींचे प्रचंड बोल्ड सीन पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अलिकडेच या सीरिजनिमित्त प्राजक्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या सीनविषयी तिच्या आईची पहिली प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं आहे.
कायम साध्या, सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहिल्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर, काहींना मात्र तिला ट्रोल केलं आहे. यामध्येच आता  तिच्या आईने हा ट्रेलर पाहिल्यानंतर काय म्हटलं हे प्राजक्ताने सांगितलं.

"प्रेक्षकांकडून या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. कारण, महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख होती. त्यामुळे हा प्रोजेक्ट स्वीकारतांना माझ्या चाहत्यांना ते खटकणार याचा मला पूर्णपणे अंदाज होता. पण, तो टीझर होता. त्यामुळे यात मी नेमकी कोणती भूमिका साकारतीये हे लोकांना समजलं नव्हतं. पण, आता ट्रेलरमधून सगळ्यांनाच समजलं असेल. यात मी कामाठीपुरामधील सेक्स वर्करची भूमिका साकारत आहे.प्रदर्शित झालेला टीझर आणि सीरिज वेगवेगळा आहे. त्यामुळे तुम्ही आधी सीरिज पाहा मग सांगा", असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "या सीरिजचा पहिला एपिसोड वाचून झाल्यानंतर मी पाच मिनिटं टाळ्याच वाजवत होते. आणि, मला यामधील कोणतीही भूमिका द्या मी ही सीरिज करायला तयार आहे हे एक कलाकार म्हणून माझं ठरलं होतं.  ही सीरिज पाहिल्यावर माझ्या आईनेही प्रतिक्रिया दिली."

काय म्हणाली प्राजक्ताची आई?

"माझी आई माझ्यापेक्षाही बोल्ड आहे. त्यामुळे ती माझ्यापेक्षा १० पावलं पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. ती एक कलाकार आणि माणूस म्हणून माझी विभागणी सहज करु शकते. त्यामुळेच ही सीरिज करण्यापूर्वी मी तिची परवानगी घेतली. आणि, एक कलाकार म्हणून तिने मला या सीरिजसाठी पाठिंबा दिला," असं प्राजक्ताने सांगितलं.

पुढे ती म्हणते, ही सीरिज करण्यापूर्वी मी आईची रितसर परवानगी घेतली होती. मी स्क्रिप्ट पूर्णपणे ऐकलं आहे आणि ते तगडं आहे. यात माझी भूमिका अमूक अमूक आहे, असं मी स्पष्ट सांगितलं. त्यावर, आलिया भट्टचा कामाठीपुरावर एक चित्रपट येतोय गंगुबाई काठियावाडी. जर आलिया यात ते काम करु शकते, तर तू का नाही? असा प्रतिप्रश्न विचारत आईने मला पाठिंबा दिला.

दरम्यान, या सीरिजमध्ये प्राजक्ता आणि तेजस्विनीसह मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. यात मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, आनंद जोग, वनिता खरात, मोहन जोशी, अभिजीत पानसे, सुरेखा कुडची, वैभव मांगले, सचिन खेडेकर ही दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते.  ट्रेलर बघता, ही केवळ एक बोल्ड कथा नाही तर या सीरिजमध्ये राजकीय थरार पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होतं. 

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!

'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच!

अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx

आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

Web Title: marathi actress prajaka mali mother reaction on ranbazar web series bold scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.