Next

‘श्रीं’च्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 02:26 PM2018-06-25T14:26:32+5:302018-06-25T14:27:04+5:30

वाशिम - श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवार, २५ जून रोजी सकाळी १० वाजता ...

वाशिम - श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवार, २५ जून रोजी सकाळी १० वाजता अकोला-वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर वसलेल्या मेडशी येथे आगमन झाल्यानंतर भाविकांनी भावपूर्ण स्वागत केले. ६०० पेक्षा अधिक वारक-यांचा सहभाग असलेल्या या पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील भाविक मेडशी येथे सज्ज झाले होते.