Next

नागपंचमीनिमित्त चिमुकले घेताहेत पाळण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:48 PM2017-07-26T17:48:14+5:302017-07-26T17:48:39+5:30

शिरपूर (वाशिम), दि. 26 - श्रावण महिन्यात येत असलेल्या नागपंचमीच्या आदल्यादिवशी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पाळणे बांधल्या जातात. यावर लहानापासून ...

शिरपूर (वाशिम), दि. 26 - श्रावण महिन्यात येत असलेल्या नागपंचमीच्या आदल्यादिवशी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पाळणे बांधल्या जातात. यावर लहानापासून तर मोठयापर्यंत झोके घेतांना दिसून येतात. हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याचे खूप महत्व आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रिया व मुलींची मोठी धावपळ असते. तेव्हापासून एकेक सण सुरू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना असून या महिन्यात देवाच्या कहाण्या, पोथ्यांचे वाचन केले जाते. या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहिती मिळवली जाते. श्रावण महिन्यात नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्म हे दिवस महत्वाचे आहेत. नागपंचमी ह्या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. लहान मुलीनं पासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळामध्ये भाग घेतात. शिरपूर परिसरातील शाळा, घरांसमोर झुले बांधून त्याचा आनंद चिमुकले घेतांना दिसून येत आहेत.