Next

सहा वर्षापासून पायदळ दिंडीची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:40 PM2017-08-10T18:40:01+5:302017-08-10T18:40:11+5:30

शिरपुर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या संत ओंकारगीर बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेलगाव ओंकारगीर येथून श्री संत शेगाव ...

शिरपुर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या संत ओंकारगीर बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेलगाव ओंकारगीर येथून श्री संत शेगाव अशी पायदळ दिंडी गत सहा वर्षापासून आयोजित केली जाते. यावर्षीही पायदळ दिंडी १० ऑगस्ट रोजी शेकडो भाविकांच्या साक्षीने शेगावकडे मार्गस्थ झाली. शेलगाव येथे ओंकारगीर बाबा मंदिरात धार्मिक सोपस्कार पार पाडल्यानंतर ही दिंडी सकाळी शिरपूरकडे रवाना झाली. शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानवर दिंडीचे स्वागत करण्यात आले. येथे भाविकांना दुपारचे भोजन देण्यात आले. त्यानंतर शिरपूर नगरीतून मार्गक्रमण करीत सदर दिंडी मालेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली.